विदर्भ व नागपुरातील बुधवारच्या (ता. 15 ) महत्त्वाच्या घडामोडी
  • 3 years ago
नागपूर : मधुमेह, उच्च रक्तदाब, श्‍वसन विकार, ह्दयविकार अशा गंभीर आजाराच्या विळख्यात सापडलेल्या रुग्णांना कोरोना विषाणू लगेच कवेत घेत आहे. त्याला उपचारासाठी वेळच देत नाही. जुलै महिन्याच्या 15 दिवसात 15 जण कोरोनाच्या बाधेने मृत्यू पावले.

नागपूर : गेल्या दीड महिन्यापासून नागपूरकर ज्या जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत होते, तो अखेर काल रात्री बरसला. रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसाने नागपूरकर सुखावले. अवघ्या बारा तासांत तब्बल 100 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.

नागपूर : साडेचार वर्षापूर्वी दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रवी बंगने आजारावर मात करीत, सीबीएसई बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. दर दोन महिन्यातून उपचारासाठी मुंबईच्या वाऱ्या आणि सातत्याने आरोग्य जपण्यासाठी आलेल्या मर्यादा आणि नैराश्‍यानंतरही जिद्दीच्या भरवशावर स्वत:ला सावरुन अनेकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

भामरागड (जि. गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासुन 20 कि. मी. अंतरावरील अतिदुर्गम आदिवासी गाव कुच्चेर स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही विजेअभावी अंधारात होते. मात्र नारगुंडा पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे अखेर तिथे वीज जोडणी करण्यात आली आणि वीजपुरवठा सुरू झाल्याने कुच्चेर गाव प्रकाशमान झाले.

अमरावती : विदर्भासह राज्यातील नाट्य कलाकारांचे आश्रयस्थान असलेल्या अमरावती येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनाचे रूपांतर आता क्वारंटाइन सेंटरमध्ये होत आहे. येथे पेड क्वारंटाइन रुग्णांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितले.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Recommended