विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी

  • 3 years ago
नागपूर : वाढती मागणी लक्षात घेतला सरकारने बिअर बार चालकांना नवीन दारू विकत घेऊन विक्री करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, बिअर बारमध्ये बसून पिण्यास मनाई आताही कायम आहे.

गत वर्षीच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर गोळीबार झाला होता. या प्रकरणाचा तपास मुख्यमंत्री उद्‌धव ठाकरे यांनी गुन्हे शाखेकडे दिला होता. मात्र अजूनही गुन्हेगारांचा छडा लागलेला नाही, त्यामुळे योग्य तपास व्हावा, या दृष्टिने गृहमंत्रालयाने या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे दिला आहे. आता सीआयडीला महापौरावरील गोळीबार प्रकरणाचा छडा लावण्यात यश येईल की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

नागपूर : अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत 15 जुलैपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मात्र, यापूर्वीच केंद्रीय प्रवेश समितीच्या प्रक्रियेवर संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी आक्षेप घेतला असून काही विशिष्ट कनिष्ठ महाविद्यालयांना मार्गदर्शन केंद्र वाटप केल्याचा आरोप करीत प्रक्रियेवर शाळा संचालक, मुख्याध्यापक आणि खुद्द केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय प्रवेश समितीचा घोळ चव्हाट्यावर आला आहे.

खामगाव तालुक्‍यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोरजवळा येथील तलावामध्ये गुरुवारी रात्री एक मुलीच्या जातीचे अज्ञात अर्भक आढळून आले. यामुळे गावात विविध शंकांना पेव फुटला होता. सामान्य रुग्णालयातील डॉक्‍टरांनीही पोस्टमार्टम सुरु केले. यावेळी बाहुल्याच्या आतील स्पंच बाहेर आल्याने हे अर्भक नसून बाळासारखे दिसणारे बाहुले असल्याचे समोर आले. यानंतर गावातील व पोलिस हा प्रकार कुणी केला याचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकाराची शहरासह तालुक्‍यात दिवसभर चर्चा सुरु होती.

बैलबंडी चालकाचा जरासा अंदाज चुकला आणि पाण्याचा हा भयंकल लोंढा होत्याचे नव्हते करून गेला. काही समजण्यापूर्वीच अचानक बैलबंडी नाल्यात उलटली. या अत्यंत दुर्दैवी घटनेत विनायक उपरे, हरिदास खाडे व मीना कुडमेथे यांना जलसमाधी मिळाली. ही वार्ता गावात हा हा म्हणता पोहोचली.

वर्धा : हाय रिक्‍स भागातून आयसोलेशन वॉर्डात आणण्यात आलेल्या दाम्पत्याला विलगीकरणात ठेवण?

Recommended