विदर्भ व नागपुरातील बुधवारच्या (ता. 8) महत्त्वाच्या घडामोडी
  • 3 years ago
नागपूर : मेयोच्या कोविड हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात अमरावती येथील 71 तर मध्यप्रदेशातील सिवनी येथील 68 वर्षीय व्यक्तींचा एकाच दिवशी कोरोनामुळे मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासन हादरले आहे.

नागपूर ग्रामीण : नागपूर आदी तालुक्‍यात कोरोना मोठया प्रमाणात शिरत असताना कुही तालुक्‍यालाही संसर्ग झाला आहे. मंगळवारी काटोल येथे आठ, वाडीत 1, कुहीत एक, कामठीत एक रूग्ण आढळले आहेत.

नागपूर : शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेला माजी शहरप्रमुख मंगेश कडव हा आता पोलिसांना शरण येण्याच्या तयारीत असल्याची शहरभर पसरली आहे. तो कधी शरण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी काल रात्री व आज असे एकूण 133 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 105 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 28 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.

संग्रामपूर (जि.बुलडाणा) ः नवीन नियमावली नुसार कृषी केंद्र सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत खुले ठेवण्याचे स्थानिक प्रशासनाने सूचित केले आहे. वास्तविक पाहता ही वेळ शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे.

धाबा (जि. चंद्रपूर) : गोंडपिपरी तालुक्‍यातील किरमिरी येथील वर्धा नदीच्या घाटावर चक्क नावेने दारूतस्करी केली जाते. लगतच्या तेलंगणातून मोठ्या प्रमाणात नावेद्वारे गोंडपिपरी तालुक्‍यात दारू आणली जाते.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Recommended