विदर्भ व नागपुरातील गुरुवारच्या महत्त्वाच्या घडामोडी Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |
  • 3 years ago
नागपूर : प्लाझ्मा थेरपीची सुविधा नागपुरात उपलब्ध आहे, परंतु प्लाझ्मा दान दात्यांकडून मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध होत नाही. त्यामुळे कोरोना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याचे संकेत मिळाले आहेत.

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल गुरूवारी (ता.16) घोषित करण्यात आला. .नागपूर विभागाचा निकाल 91.65 टक्के लागला आहे. गेल्यावर्षी सर्वात शेवटी नवव्या स्थानावर असलेल्या नागपूर विभागाने यंदा मुंबई, लातूर, औरंगाबाद आणि नाशिक विभागाला धक्का देत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

अमरावती : पावसामुळे सुमारे सत्तर वर्षे जुन्या महात्मा गांधी व्यापारसंकुलातील दुकानांच्या भिंतीत पाणी मुरले. मध्यरात्री दोनच्या सुमारास पंधरा दुकाने कोसळली. रात्री ड्यूटीवर तैनात दोन चौकीदार कोसळलेल्या इमारतीच्या मलब्याखाली दबले.

चंद्रपूर : धानाच्या बांध्यात मत्स्यपालन असे कुणी सांगितले तर त्यावर कुणाला विश्‍वास बसणार नाही. पण हे खरे आहे. चंद्रपूर तालुक्‍यातील नंदगुर या गावातील एका शेतकऱ्याने चक्क धानाच्या बांध्यात मत्स्यपालनाचा नवा प्रयोग केला. यात तो यशस्वी झाला आहे. मत्स्य पालनातून त्याला दीड ते दोन लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

अमरावती : लग्नानंतर नवरीसोबत तिच्या सासरी गेलेल्या बहिणीचे एका युवकाने अपहरण करून स्वत:च्या घरात डांबून ठेवले व तिला मारहाण केली. पीडित तरुणी बऱ्याच दिवसांपासून दहशतीत होती. अखेर तिने फ्रेजरपुरा ठाणे गाठून तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी अभिजित कैलास खोडे, प्रतीक दीपक बोरकर व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended