विदर्भ व नागपुरातील गुरुवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | आजच्या ठळक बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
उत्तर प्रदेशातील जिल्हा आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली . उत्तर प्रदेशातील दलितांवरच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले आहे.

महाराष्ट्रातील शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी १ तारखेपासून सुरू झालेल्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रियेच्या नियमात मोठा बदल करण्यात आला आहे.

नागपूरची आंतरराष्ट्रीय खेळाडू धनश्री लेकुरवाळे हिची भारतीय योगा फेडरेशनतर्फे आयोजित चौथ्या फेडरेशन चषक ऑनलाइन योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत ती सिनियर गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. माया सुगत जंगम (२२, पाचनल चौक) असं मृत महिलेचं नाव आहे. सुगत आणि माया यांच पाच वर्षांपूर्वी लग्न झाल होत. त्यांना मुलबाळ नव्हत.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended