नागपूरसह विदर्भातील सोमवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : वाढीव बिलाचा महावितरणने दिलेला शॉक आणि महावितरणचा दुर्लक्षित कारभार यामुळे व्यतिथ उपराजधानीतील वीजग्राहकाने जाळून घेत आत्महत्या केली. शनिवारी यशोधरानगर हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर जनमानस प्रक्षृब्ध झाले आहे. लीलाधर लक्ष्मण गायधने (५६) रा. पाहुणे ले-आउट असे मृताचे नाव आहे. त्यांना तब्बल ४० हजारांचे वीजबिल पाठविण्यात आहे होते. महावितरण कार्यालयाकडे तक्रारी केल्या, वारंवार चकरा मारल्या, अधिकाऱ्यांच्या भेटी घेत विनवण्याही केल्या. उलट बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला. या प्रकाराने ते कमालीचे व्यथित झाले. यातूनच त्यांनी जास्त दारू पिण्यास सुरुवात केली होती. शनिवारी दुपारी घरासमोरच अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले.

नागपूर : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’ योजने अंतर्गत किरायाची रक्कम शासनातर्फे देण्यात येते. परंतु मागील दोन वर्षीची रक्कमच शासनाने दिलीच नाही. घरमालकाकडून किरायासाठी तकादा लावण्यात येत आहे. सरकार पैस देत नाही आणि विद्यार्थ्यांकडे पैसा नाही. हा पैसा न मिळाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून मुकण्याची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर : केवळ पक्ष, संघटन येवढाच विचार करून चालणार नाही. नागरिकांची कामे करण्यासाठी सत्ता हवी असते. सत्ता असली की पक्षसुद्धा बळकट होतो. तेव्हा निवडणूक केंद्रीय पद्धतीने लढण्याची गरज आहे. भाजप त्याच पद्धतीने लढते. म्हणून त्यांच्या जास्त जागा निवडूण येतात. नाही तर भाजपचे अनेक खासदार असे आहेत, जे नगरसेवक म्हणूनही निवडून येऊ शकत नाही, असा टोला असे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

अमरावती : जिल्ह्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. तिवसा शहरातील आंबेडकर चौक येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरात घुसून अजय बाबाराव दलाल (वय २५, रा. तिवसा) याची काही युवकांनी हत्या केली. चक्क आई, वडील व बहिणी देखत हत्यचा थरार घडला. या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #

Recommended