नागपूरसह विदर्भातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी स्वतःला आयसोलेट केले असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, ते नुकतेच बिहारमधून निवडणुकीचा प्रचार करून परतले होते. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणीही केली होती. या दरम्यान त्यांना लागण झाल्याची शक्यता आहे.

नागपूर : नागपूरहून जबलपूरसाठी दररोज स्पेशल रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही गाडी रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी जबलपूरवरून निघेल. सोबतच नागपूरमार्गे दानापूर - बँगलोर स्पेशल ट्रेन सोडली जाणार आहे. ही गाडी द्विसाप्ताहीक असून, २६ ऑक्टोबर ते १ डिसेंबरच्या कालावधीमध्ये धावणार आहे. कोरोना आणि त्यात सणासुदीचे दिवस असल्याने रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूर : मूल तालुक्यात अतिशय दुर्मिळ नाणं सापडलं आहे. या नाण्याच्या वरच्या बाजूस टॅक्सीव्ह असं इंग्रजी अक्षर कोरलंय, तर खालच्या बाजून VER लिहिलं आहे. ते वरलेमिओ हे राजधानीचं ठिकाण सूचित करतात. हे नाणं गोलाकार असून १० ग्रॅम वजनाचं आहे. ब्रिटनमध्ये रोमन साम्राज्याचा शिरकाव होण्यापूर्वी सेल्टिक जमातीचं राज्य होतं. या जमातीचा दुसरा राजा टँसिओवेनसचं हे नाणं असल्याचं अभ्यासक सांगतात. त्यामुळं चंद्रपूरचा संबंध ब्रिटेनच्या पूर्वइतिहासाशी जोडला जातो की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गडचिरोली : धानोरा तालुक्‍यातील मेंढाटोला गाव संघटनेच्या महिलांनी दारू अड्ड्यावर छापा टाकला. दारूसह मुद्देमाल जप्त करून पोलिसांच्या स्वाधीन केला. तसेच दारूविक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी गाव संघटनेनं केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर : महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते विलगीकरणात असतानाही त्यांच्या वाहनांची बिले मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महापालिका आधीच आर्थिक संकटात आहे. त्यात कोरोनामुळे आणखीनच स्थिती गंभीर झाली आहे. त्यातही असा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागपूर : कोदामेंढी तालुक्यातील आडेगाव इथं मरण?

Recommended