नागपूरसह विदर्भातील मंगळवारच्या महत्त्वाच्या घडामोडी | Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या |

  • 3 years ago
नागपूर : मनपा सत्ताधाऱ्यांनी आता तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध रणशिंग फुंकले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाणी करवाढ मागे घेण्याचा प्रश्नच नाही आणि याबाबतचे देयकही वाटण्यात आल्याचं नमुद केला होतं. मात्र पाणी करात वाढ करण्याचा आयुक्तांचा निर्णय चुकीचा आहे. तसंच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांवर हा अन्याय आहे असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. पुढील तीन दिवसांत निर्णय मागे घेतला नाही, तर १३ ऑॅगस्टपासून भाजपचे सर्व १०८ नगरसेवक आयुक्तांच्या कक्षापुढे आंदोलन करतील, असा इशारा सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी आज दिला आहे.

अमरावती : खासदार नवनीत राणा यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तेव्हापासून त्यांच्यावर अमरावतीच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे पुढच्या उपचारासाठी त्यांना नागपूरमध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार नवनीत राणा सोमवारी रात्री नागपूरकडे रवाना झाल्या. त्यांना नागपूर येथील ओक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची चमू नवनीत राणा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, असं युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सांगितल आहे.

नागपूर : जिल्हयात मागच्या आठवड्यापासून पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे पेंच धरण तब्बल ९६ टक्के भरलं आहे. काल धरणाचे ६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रशासनानं कन्हान आणि पेंच नदीकाठावर राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. येत्या दोन दिवसात तोतलाडोह धरणाचेही गेट उघडण्याची शक्यता सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता राजेश राठोड यांनी व्यक्त केली आहे.

यवतमाळ : पावसाळा सुरू झाला की घर गळू नये म्हणून घराच्या छताची दुरुस्ती सुरू होते. अशाच एका घरी टिनपत्रे टाकण्याचं काम सुरू होतं. मात्र यामुळे दोन भावांमध्ये प्रचंड भांडण झालं. त्यातील एका भावाला या भांडणात जीव गमवावा लागला. घरावर टिनपत्रे टाकण्याच्या वादात मोठ्या भावाचा लहान भावाने नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून खून केला. ही घटना शिवणी येथे रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात तणावाचं वा?

Recommended