*विदर्भ व नागपुरातील शुक्रवारच्या (ता. १9 ) महत्त्वाच्या घडामोडी*

  • 3 years ago
नागपूर ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शाळा सुरू करणे धोक्‍याचे ठरेल. कोरोनाच्या काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करावे. मात्र, शाळा सुरू करण्यास परवानगी नाही, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज स्पष्ट केले. शाळांनी पालकांना एकाच वेळेस शुल्क भरण्यास सक्ती न करता त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने शुल्क वसूल करावे, अशा सूचना केल्या.

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. रोज दोन अंकी आकड्यात होणाऱ्या वाढीमुळे प्रशासन चिंतेत आहे. असे असताना काटोलमध्ये गुरुवारी आठ वर्षीय बालकासह माय-लेक पॉझिटिव्ह निघाले. यामुळे बालकासोबत खेळणारी आठ ते नऊ बालके व त्यांच्या कुटुंबांना नागपूर वनामती, आमदार निवास व इतर ठिकाणी क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. काटोल ग्रामीण रुग्णालयाने धडक मोहीम राबवून 39 संशयितांना नागपूरला पाठविले. यात नऊ बालकांचा समावेश असल्याचे डॉ. सुधीर वाघमारे यांनी सांगितले.

यवतमाळ : यंदा कोरोनाचे संकट शिरावर असताना पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना नवीनच संकटाचा सामना करावा लागत आहे. निसर्ग अनुकूल असतानाही शेतकरी मात्र सुलतानी कारभाराचे बळी ठरले आहेत. कोरोनाचे संकट घोंघावत असताना शेतकऱ्यांपर्यंत बोगस व निकृष्ठ दर्जाचे बियाणे पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली आहे.

चिखलदरा (जि. अमरावती) : अंधश्रद्धेच्या खाईत लोटल्या गेलेल्या मेळघाटात आजही चिमुकल्याच्या शरीरावर कुठल्याही आजारासाठी तप्त सळाखीने चटके दिले जातात. हा अघोरी प्रकार सतत सुरूच असतो. असाच एक प्रकार बोरधा या गावात उघडकीस आला आहे. या संतापजनक प्रकरणात काटकुंभ आरोग्य केंद्राच्या डॉक्‍टरांनी संबंधित मांत्रिकाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविली आहे.फ

बुलडाणा : कोरोनामुळे शेती मालाला भाव नाही त्यातही माल खरेदीची होत असलेली अडचण पाहता शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरू झाली असून, आर्थिक संच बसणे कठीण झाले आहे. दरम्यान, पीककर्जासाठी बॅंका आडमूठ धोरण घेत असल्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्‍न उभा राहत आहे.

अहेरी : अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या किराणा दुकानात खर्रा तसेच कुठलाही तंबाखूज?

Recommended