विदर्भ व नागपुरातील बुधवारच्या (ता. 24 ) महत्त्वाच्या घडामोडी
  • 3 years ago
नागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शहरातील नागपूर महापालिकेची दवाखाने विकसित
करण्यासोबतच महापालिकेचा पाचपावली दवाखाना, सदर दवाखाना, केटी नगर दवाखाना, इंदिरा गांधी रुग्णालय
कोविड सेंटर तयार करण्यासंदर्भात हालचाली होत्या. मात्र, मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरला बदलून कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आले आहे.

यवतमाळ ः जिल्ह्यातील दिग्रस तालुक्‍यातील हरसूल येथील राजेश सवने या शेतकऱ्याने फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संवेदना मांडल्या आहेत. सरकार व प्रशासन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करीत आहे.

यवतमाळ ः जिल्ह्यातील वणी तालुक्‍यातील पळसोनी या गावात अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनीच लोकवर्गणीतून स्मशानभूमी बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागपूर ः पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत करोनाची लस विकसित केली जात असून सर्वप्रथम माकडांवर चाचणी केली जाणार आहे.

नागपूर : घरगुती वीजग्राहकांना जून महिन्यात आलेल्या एकत्रित बिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha
Recommended