विदर्भ व नागपुरातील शनिवारच्या महत्त्वाच्या घडामोडी

  • 3 years ago
नागपूर : सहा मित्रांनी लॉकडाउननंतर मौजमस्ती व पार्टी करण्याचे ठरवले. पार्टी करण्यासाठी उमरेडजवळील मकरधोकडा येथील जलाशयावर जाण्याचा बेत आखला. येथे सहाही युवकांनी पार्टी केली. काही वेळांनी त्यांना पाण्यात उतरण्याचा मोह आवरता आला नाही. सर्वजण जलाशयात पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना रोहित गोंडाणे व कौशिक लारोकर गटांगळ्या खाऊ लागले. इतरांनी त्यांना वाचविण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. धोका ओळखून अन्य चारही जण जलाशयाबाहेर निघाले. रोहित व कौशिक यांना पोहता येत नसल्याने त्यांना जलाशयात बुडून मृत्यू झाला.

भंडारा : धानाच्या तणसापासून बायोइथेनॉल तयार करण्याचा मकरधोकडा येथील प्रस्तावित प्रकल्प इतरत्र हलविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला आहे.

नांदगावखंडेश्वर (जि. अमरावती) : गुरुवारी (ता. 25) नांदगावखंडेश्वर शहरात पुण्यावरून आलेल्या 28 वर्षीय युवकाचा आरोग्य तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या नांदगावखंडेश्वर येथील 27 नागरिकांना अमरावती ते यवतमाळ रोडवरील समाजकल्याण निवासी वसतिगृहात विलगीकरण करण्यात आले होते. त्यामधील अजमल खान सत्तार खान (वय 28, रा. प्रभाग दोन, नांदगावखंडेश्वर) याने 27 जून रोजी विलगीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहातील खिडकीला स्वत:जवळ असलेला दुपट्टा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी सव्वा सातला उघडकीस आली.

भद्रावती(जि. चंद्रपूर) : शहरात बाहेरून आलेल्यांना विविध ठिकाणी क्‍वारंटाईन करण्यात आले असून यातील दहा जणांना आरोग्य विभागाने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी एकाच रुग्णवाहिकेतून नेले होते. यातील दोन व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव निघताच उर्वरीत आठ व्यक्‍तींना तर याचा संसर्ग झाला नाही ना या भीतीने ते आठ जण आणि त्यांचे पालक भयभीत झाले आहेत.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Recommended