विदर्भ व नागपुरातील मंगळवारच्या (ता. ७) महत्त्वाच्या घडामोडी

  • 3 years ago
नागपूर : शिवसेनेचा निलंबित केलेला खंडणीबाज शहर प्रमुख मंगेश कडव याने शिवसेना पक्ष फंडाच्या नावाखाली कोट्यवधीची माया कमावलेली आहे. लाखो रुपये मंगेशने पत्नी रूचिता व तिच्या नातेवाईकांना दिले होते. रूचिताच्या नावावर विक्री केलेल्या फ्लॅटची रजिस्ट्रीसुद्धा केली होती. सोमवारी गुन्हे शाखा पोलिसांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्याची पत्नी रुचिता मंगेश कडव हिला अटक केली.

राज्य शासनाने शाळा सुरू करण्याबाबत काही निर्देश जारी केले असून त्यात प्राथमिक व पूर्व प्राथमिकचा उल्लेखही नाही. त्यानंतरही शहरातील काही विना अनुदानित खाजगी शाळांनी प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरू केलेत. शिक्षण उपसंचालकांनी सुद्धा शाळा सुरू करण्याचे आदेश येतपर्यंत विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे शिक्षण देवू नये, असे स्पष्ट निर्देश दिलेत.

नागपूर : पोलिसांशी असलेल्या मैत्रीच्या आधारे सामान्य माणसांना नाडणाऱ्या आणि "लुटेरी दुल्हन' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीती दासला भंडारा पोलिसांनी अटक केली. तिने दोघांना शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोघांची 25 लाखांनी फसवणूक केली होती.

गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षकांच्या वाहन चालकाने रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलिस संकुल परिसरात घडली. मदन गौरकार (47) असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव होते.

वाशीम जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांनी ५ जुलै रोजी वाशीम येथे बैठकीत कृषिसेवा केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बंद मुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना चागलाच त्रास सहन करावा लागत आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ही साखळी तोडण्यासाठी येते दोन आठवडे अर्थात 7 ते 21 जुलै पर्यंत सकाळी 9 ते दुपारी तीन वाजेपर्यंतच अत्यावश्‍यक सेवा दुकाने सुरू राहतील. दुपारी तीन नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेपर्यंत अत्यंत कठोर संचारबंदी राहणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केली.

#Nagpur #NagpurNews #Vidarbha #VidarbhaNews #News #SakalNews #Sakal #MarathiNews #Amravati #Yavatmal #Bhandara #Gondia #Chandrapur #Gadchiroli #Wardha

Recommended