गुमगावचा ऐतिहासिक ‘किल्ला’ नामशेष होण्याच्या मार्गावर | Gumgaon | Nagpur | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
हिंगणा तालुक्यातील सर्वांत मोठ्या गावात गणना होणाऱ्या गुमगाव या गावाला सुद्धा भोसलेकालीन ऐतिहासिक दगडी तटबंदीचे वैभव प्राप्त झालेले आहे. ऐतिहासिक वास्तूचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या तटबंदीला उरलेले आणि कुजलेले अन्न, जागोजागी पडलेले प्लॅस्टिक, अस्वच्छता आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अवकळा आलेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि नागरिकांच्या अस्वच्छतेच्या सवयीमुळे हा ऐतिहासिक वारसा लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्या या किल्ल्याच्या आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य आहे. परिसरात असलेल्या सभागृहात होणाऱ्या जेवणाच्या कार्यक्रमानंतर भांडे घासून उष्ठे आणि उरलेले अन्न, प्लॅस्टिक, पात्रावळी आणि इतर कचरा तटबंदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टाकला जातो. किल्ल्याला आलेली ‘अस्वच्छतेची तटबंदी’ बघून स्थानिक लोकप्रतिनिधींचे उदासीन आणि निष्क्रिय धोरण आणि नागरिकांच्या अस्वच्छतेच्या सवयी निदर्शनात येते. (व्हिडिओ - रवींद्र कुंभारे)
Recommended