मल्चिंग,ठिबक सिंचनद्वारा प्रमोद आष्टनकर यांनी पालटले शेतीचे 'रुपडे' | Nagpur | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
गुमगाव (जि. नागपूर) : पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांमध्ये मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचनाचा प्रयोग करून आर्थिक उन्नती साधण्याचा यशस्वी प्रयत्न प्रमोद वासुदेव आष्टनकर या युवा शेतकऱ्याने केला आहे. पाच वर्षांपासून मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा शेतामध्ये प्रयोग करून टरबूज, काकडी, वांगी, टमाटर, चवळा, तूरसारख्या पिकांचे विक्रमी उत्पादन घेण्याची किमया त्यांनी साधली आहे. टरबुजाचे उत्पन्न घेणारे आणि पिकपद्धतीमध्ये मल्चिंगचा वापर करणारे प्रमोद आष्टनकर गुमगाव परिसरातील पहिले शेतकरी आहेत. त्यांच्या शेतातील टरबूजाला आता शहरातील मॉलमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेतला तर तोट्याचा व्यवसाय समजली जाणारी शेती फायदेशीर ठरू शकेल, यात शंका नाही. (व्हिडिओ :रवींद्र कुंभारे)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended