आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना तहसीलदार प्रमोद कदम यांनी केली दमदाटी | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड : माझे कुटुंब ,माझी जबाबदारी या राज्यव्यापी कार्यक्रमाचे उदघाटन नुकतेच आमदार राजू पारवे यांचे हस्ते संपन्न झाले ,त्यानंतर लगेचच उपस्थित आरोग्य कर्मचारी , आशा वर्कर , आरोग्य सेविका , शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना तालुका आरोग्य अधिकारी , ग्रामीण रुग्णालयाचे वरिष्ठ आरोग्य अधिकारी , नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांचे समक्ष प्रशिक्षण देण्यात आले .
त्यानंतर दोनच दिवसांनी नगर परिषदेच्या सभागृहात मुख्याधिकारी राजेश भगत , तहसीलदार प्रमोद कदम , तथा आरोग्य अधिकारी यांचे उपस्थितीत सर्व शिक्षक , आशा वर्कर , आरोग्य सेविका व अन्य कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूप समजावून देत सुरक्षा कवच म्हणून मास्क आणि सेनेटायझर चे वाटप करण्यात येत असताना काही निवडक कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दर्शविला असता त्यांना तहसीलदार प्रमोद कदम यांनी दमदाटी केली असल्याचा आरोप महिला आरोग्य कर्मचारी यांनी केला असता दोन्ही बाजूंचा आढावा घेण्यात आला. (व्हिडीओ - सतीश तुळसकर)
#Nagpur
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended