संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी. | Nagpur | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड : (जि. नागपूर) रोज मंगळवार संताजी फाउंडेशन उमरेडच्या वतीने स्थानिक संत जगनाडे महाराज चौक येथे तेली समाजाचे आराध्य दैवत संत जगनाडे महाराज यांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आली. याप्रसंगी उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू पारवे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेश भगत, नगराध्यक्ष विजयालक्ष्मी भदोरिया, माजी नगराध्यक्ष गंगाधरजी रेवतकर, विलासजी मुंडले (अध्यक्ष संताजी फाऊंडेशन) आदी मंडळी उपस्थित होती. मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून संत शिरोमणी संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मान्यवरांनी संताजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनपटावरील विविध पैलूंचा उलगडा केला तर तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, संताजी महाराजांचा सम्राकासाठी, समाजभावनासाठी जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा मी आमदार या नात्याने ते सर्व विकासकामे करण्यास कटिबद्ध राहील असे प्रतिपादन आमदार राजू पारवे यांनी केले. (व्हिडिओ : सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended