कोल्हापुरात शिवजयंती उत्साहाने साजरी | Kolhapur | Shiv Jayanti | Maharashtra | Sakal Media | Sakal

  • 3 years ago
कोल्हापूर : जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ जय शिवराय अशा जयघोषात शहर परिसरात शिवजयंती उत्साहाने साजरी झाली. किल्ले पन्हाळगडावरून पहाटेच शिवज्योती शिवभक्तांकडून त्यांच्या गावी रवाना झाल्या. बालचमूंनी परिसरात फेरी काढून शिवजयंतीचा उत्साह टिपेला पोचवला. चौकाचौकात ध्वनिक्षेपकावर लावलेल्या वीरश्रीयुक्त पोवाड्यांनी शिवकाळ उभा केला. दरम्यान, शिवभक्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नर्सरी बागेत बांधलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातील शिवरायांच्या मूर्तीचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते पूजन झाले.

बातमीदार - संदीप खांडेकर
व्हिडीओ - सचिन सावंत

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended