राज्य सरकारचे सल्लागार राज्याला बुडवायला निघाले : देवेंद्र फडणवीस | Nagpur | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
नागपूर : राज्य सरकारचे सल्लागार कोण आहे हे समजत नाही. जे या राज्यालाही बुडवायला निघाले आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. बुलेट ट्रेनच्या कारशेडसाठी सरकार बिकेसीची जागा घेत आहे. बिकेसीची जागा ही प्राईस लँड आहे. त्यामुळे २५ हेक्टर जागेसाठी २५ ते ३० हजार कोटी रुपयांचा खर्च लागेल. तसेच जमिनीखाली डेपो करीत असल्याने पाचशे कोटी रुपयांचे काम पाच हजार कोटींवर नेले जात आहे. सरकार राज्यातील सर्व प्रोजेक्ट बंद करायला निघाली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. संजय राऊत यांनी न्याय व्यवस्थेवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांनी टीका केली. सरकारने चुकीचे काम करायचे आणि न्यायालयाने चूक दाखविल्यावर न्यायव्यवस्थे दोष द्यायचे हे न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचेही फडणवीस म्हणाले.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended