द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र' - मीनाक्षी वाळके | गोष्ट असामान्यांची भाग ५२ | Meenakshi Walke
  • 8 months ago
चंद्रपूरच्या मिनाक्षी वाळके यांनी बांबू कलेच्या माध्यमातून देशातच नव्हे तर जागतिक स्तरावरही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बांबूपासून राखी, लॅम्प, तोरण इतकंच काय तर बांबूवर क्यूआर कोड साकारण्याचा देशातील पहिला अनोखा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखवला आहे. 'अभिसार इनोव्हेटिव्ह'च्या माध्यमातून त्या देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिला, मुलींना बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षण देत आहेत. त्याबरोबरच रोजगाराची संधीही उपलब्ध करून देत आहेत. मिनाक्षी यांच्या बांबू कौशल्याचा सन्मान अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने करण्यात आला आहे. नुकताच त्यांच्या जीवनावर आधारीत एक लघुपट देखील प्रदर्शित झाला आहे.
Recommended