भीमगीतांचं डिजिटायझेशन करणारे सोमनाथ आणि स्मिता | गोष्ट असामान्यांची भाग ३२
  • last year
महाराष्ट्रातील गाव खेड्यांमध्ये गायल्या जाणाऱ्या भीमगीतांचं डिजिटायझेशन करण्याचा अनोखा प्रकल्प सोमनाथ वाघमारे आणि स्मिता राजमाने यांनी हाती घेतला आहे. डिजिटल बुकमोबाईलच्या माध्यमातून भीमगीतं आणि ती गाणाऱ्या गायकांची माहिती लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळते. सोमनाथ हे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन या गायकांची भेट घेतात व ही भीमगीतं रेकॅार्ड करतात. त्यानंतर ही संपूर्ण माहिती डिजिटल बुकमोबाईलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाते. याची बेवसाईटही सुरू करण्यात आली आहे. या भीमगीतांना आणि ती गाणाऱ्या गायकांनाही एक ओळख मिळावी. नव्या पिढिला त्याची माहिती व्हावी, या उद्देशाने सोमनाथ आणि स्मिताचं काम सुरू आहे.
Recommended