देशी वाणांच्या बियाणांच्या संरक्षक - राहीबाई पोपेरे | गोष्ट असामान्यांची भाग ५०
  • 9 months ago
अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या राहीबाई सोमा पोपेर यांनी देशी वाणांच्या बियाणांची एक बीज बँक तयार केली आहे. यामध्ये पांढरी वांगी, हिरवी वांगी, वाल, पांढरी तूर व अनेक प्रकारच्या रानभाज्यांचा देखील समावेश आहे. राहीबाईंच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने २०२० मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कानं सन्मानितही केलं होतं. आरोग्यासाठी देशी बियाणांचा आहारात वापर केला जावा. तसंच शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रीय शेतीची कास धरावी, असा संदेश त्या आपल्या कार्याच्या माध्यमातून देत आहेत.
Recommended