Aashadhi Pandharpur Wari | १३ जूनला पंढरपूर वारी, महिनाभरआधीच पालखीची तयारी | Sakal Media
  • 2 years ago
Aashadhi Pandharpur Wari | १३ जूनला पंढरपूर वारी, महिनाभरआधीच पालखीची तयारी | Sakal Media

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा यावर्षी १३ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या २ वर्षांपासून संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा पायी दिंडी सोहळा स्थगित झाला होता. फक्त मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत शिवशाही बसने नाथांची पालखी पंढरपूरला पाठवण्यात आल्यानं वारकऱ्यांचा हिरमोड झाला होता. मात्र आता २ वर्षांच्या खंडानंतर नाथांची पालखी पायी दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि पालखी प्रस्थान सोहळ्याला महिना असतानाही आतापासूनच पंढरपूर वारीच्या तयारीला सुरुवात झालीय.

Recommended