पुण्यात बनताहेत ऑक्सफर्डच्या लसचे 100 कोटी डोस | Oxford University Covid Vaccine Update | Pune

  • 3 years ago
ऑक्सफर्ड विद्यापीठानी जी लस तयार केली आहे आणि जी लवकरच बाजारात येणार आहे, त्या लसीचे १०० कोटी डोस हे पुण्यातल्या सीरम ईन्स्टीट्युटमध्ये बनणार आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अमेरिकेतली अॅस्ट्राझेनका आणि आदेर पुनावाला या दानशूर व्यक्तीच्या मालकीच्या सीरम ईन्स्टीट्यूटमध्ये नुकताच करार झालाय. या करारांतर्गत ही लस बनणार आहे. त्यामुळे भारताचा कोरोनाच्या विरोधातल्या लढाईतला वाटा हा संपूर्ण जगाला समजणार आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ऑक्सफर्डच्या या लसीच्या मानवावरील चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
या त्रीपक्षीय करारानुसार सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लसीचे उत्पादन सध्या सुरू आहे. यापैकी 40 कोटी व्हॅक्सिन 2020 मध्ये तयार होतील. या लसीच्या संशोधनात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या सोबतच पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच योगदानही सर्वात मोठं आहे. आणि त्यामुळे भारताला देखील याचा सर्वात मोठा फायदा होईल. आता ऑक्सफर्डची ही लस सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येण्याची शक्यता असल्याने कोरोनावर मात करणं शक्य होईल, अशी आशा व्यक्त केली जातेय.

#OxfordUniversity #Covid19 #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended