CM Uddhav Thackeray यांना मध्यप्रदेशमधून आमंत्रण | Maharashta News

  • 3 years ago
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आदी मंडळींनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. खातेवाटपानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा स्वर्गीय बाळासाहेबांचे आशिर्वाद घेतले आणि मगच आपल्या कामाला सुरूवात केली. तसं पाहिलंच तर पूर्ण वेळ मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांच्या कामकाजाचा हा पहिलाच दिवस म्हणावा लागेल. कारण आतापर्यंत त्यांच्याकडे अनेक खात्यांचा हंगामी कारभार होता. शनिवारी रात्री खातेवाटपाच्या फाईलवर राज्यपालांनी सही केली. आज ठाकरे परिवार शिवतीर्थावर पोहोचला तेव्हां तिथे असलेलं एक पोस्टर सगळ्यांच लक्ष वेधून घेत होतं. एका कार्यकर्त्यांनी पधारो मध्य प्रदेश असं शिवसेनेला मध्य प्रदेशात आमंत्रण देणारं पोस्टर झळकलं. महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जाऊन एक नवीन प्रयोग केल्याबद्दल उध्दव ठाकरे यांची मागणी भाजपेतर राज्यांत वाढली आहे हेच या पोस्टरवरून दिसतंय. मध्य प्रदेशात सध्या काँग्रेसचं सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणून कमल नाथ आहेत. तिथे शिवसेनेला आमंत्रण देणारं हे पोस्टर बरंच काही सांगून जातंय
#uddhavthackeray #shivsena #madhyapradesh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Recommended