नागरिकांनो पाणी उकळूनच प्या, पाण्यामुळे होत आहेत गंभीर आजार| मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |
  • 3 years ago
नागरिकांनो पाणी उकळूनच प्या, पाण्यामुळे होत आहेत गंभीर आजार

पिंपरी : आधीच कोरोना, त्यात जलजन्य आजारांचा भरणा, अशी स्थिती पिंपरी चिंचवड शहरात निर्माण झाली आहे. पावसाच्या सुरवातीलाच
पिंपरी चिंचवड शहराच्या बहुतेक भागांमधून उलट्या, जुलाब व पोटदुखीचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. नागरीकांनी पाणी पुरवठा दूषित असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. दुसरीकडे पाणी शुद्ध असल्याचा दावा महापालिका पाणी पुरवठा विभागाने केला आहे. मात्र थेरगाव पडवळनगर मधील नागरिकांनी पालिकचे अधिकारी खोटं बोलत आहेत असे म्हटले आहे. अजून काय म्हणाले येथील नागरिक चला तर मग पाहूया हा व्हिडिओ.
(संतोष हांडे)


Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended