पिंपरीत वाढीव विजबिलांमुळे ग्राहक हैराण | Sakal Media |

  • 3 years ago
पिंपरीत वाढीव विजबिलांमुळे ग्राहक हैराण
पिंपरी : वीज ग्राहकांना एप्रिल व मे या महिन्यांची वीजबिल पोहोचली नव्हती. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना आता महावितरणकडून ग्राहकांना मीटर रीडिंग न घेता दोन महिन्यांची सरासरी वीजबिल देण्यात आली आहेत. मात्र ही देण्यात आलेली वीजबिल अवास्तव वाढीव रकमेची असल्याने ती कमी करण्यासाठी व त्याबाबतच्या तक्रारी साठी पिंपरी चिंचवड शहरातील विविध वीज ग्राहक तक्रारण निवारण कक्षात ग्राहकांची गर्दी व मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहे. सांगवी सब डिव्हिजन येथे काय परिस्थिती होती व वीज बिल ग्राहक काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडिओ. (व्हिडिओ : संतोष हांडे)
#SakalMedia #Sakal #MSEB #pimpri #PCMC #electricity bill

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended