BREAKING: SERUM INSTITUTE मध्ये आग | Fire | Pune | Maharashtra | Covishield | Sakal Media | Sakal

  • 3 years ago
पुणे - कोरोना लस तयार करणारी पुण्यातील कंपनी सीरम इन्सिट्यूटमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
सीरम इन्सिट्यूटच्या मांजरी परिसरातील एका इमारतीस गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची खबर मिळताच अग्निशामक दलाच्या मध्यवर्ती केंद्रतील 2 गाड्या तसेच कोंढवा व हडपसर केंद्राच्या 2 अशा चार गाड्या घटनास्थली रवाना झाल्या आहेत. 10 गाड्या व एक ब्रांटो व्हेईकल अशा 11 गाड्या गेल्या आहेत. सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. बीसीजी लस तयार करण्यात येते त्याठिकाणी ही आग लागली आहे. कोरोनाची लस तयार होते तो विभाग वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे. पुण्यातील मांजरी भागातील हा विस्तारीत प्लँट आहे.
देशात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून जवळपास तीन कोटी आरोग्य कर्मचाऱी आणि कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसींचा वापर यामध्ये करण्यात येत आहे.
#Pune #Serum #Fire #Viral #Breaking #Video #Sakal #SakalMedia
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended