मी महिला आमदार असूनही काहीच करु शकले नाही | नमिता मुंदडा

  • 2 years ago
बीड जिल्ह्यात कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही. सगळ्या धाब्यांवर दारु विक्री खुलेआम सुरू आहे. एक महिना अगोदर माझ्या बाळासोबत जात असताना मी पाहिलं की खुलेआम दारू पिताना काही जण दिसले. त्यातलेच काही जण आले आणि माझ्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मी फोटोला नकार दिल्यानंतर मोठा गोंधळ केला. एवढं होऊनही पोलीस अधीक्षकाने कोणतीही दखल घेतली नाही, मी यावर वारंवार तक्रार केली. मी महिला आमदार असून मला कोणतंही संरक्षण नाही. बीड जिल्ह्याचे पोलीस नेमकं काय करत आहेत.

Recommended