Nashik : नाशकात उत्साहात साजरी केली गेली चंपाषष्टी

  • 2 years ago
#KhandobaTemple #Champashashti #MaharashtraTimes
नाशिक शहरासह जिल्हाभरात भक्तीपूर्ण वातावरणात चंपाषष्टी साजरी केली जाते. करोनामुळे यात्रेला परवानगी जरी नसली तरी पारंपरिक पूजाविधी गंगा काठावर पार पडले. तर खंडोबाच्या मंदिरात जाऊन भाविकांनी दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. नाशिक शहरात असलेल्या गंगेवरच्या खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्टी मुहूर्तावर विधिवत पूजन करण्यात आलंसकाळी आरती होऊन त्यानंतर भाविकांकडून भरीत आणि भाकरीचा नैवेद्य खंडोबाला दाखवण्यात आला. अनेक भाविकांनी घरातून आलेल्या टाकाची देवाची भेट घडवून येथील वाघ्या मुरळी पाचपावली करून घेतली. सर्वत्र येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर होत होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्टी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मार्तंड मल्हारी देवाची नवरात्र सुरू होते. मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले अशी अख्यायिका असल्याचे सांगितले जाते. या घटनेच्या स्मरणार्थ म्हणून हा उत्सव साजरा केला जातो

Recommended