Sachin Sawant | Congress Questions Timing of Movie Promotion | पुन्हा निवडणूक ? | Marathi Movie

  • 3 years ago
अनेक मराठी चित्रपट कलाकार अचानकपणे #पुन्हा निवडणूक? असा हॅशटॅग Tweet करू लागले आणि एक नवाच वाद सोशल मीडियावर निर्माण झाला आहे. काहींनी कलाकारांच्या बाजूने आणि काहींनी विरोधात Twitter वर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. सिद्धार्थ जाधव, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अंकुश चौधरी, सिद्धार्थ चांदेकर अशा अनेक आघाडीच्या मराठी कलाकारांनी आपापल्या ट्विटर हँडलवर फक्त एवढा एकच हॅशटॅग लिहिला होता. त्याच्यापुढे फारसं काही स्पष्टीकरण नव्हतं. सध्याच्या राजकीय घडामोडींवर मराठी कलाकारांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे, असं समजून अनेक जणांनी या कलाकारांना पाठिंबा दिला, तर अनेकांनी ट्रोलही केलं. भाजपचा हा डाव असल्याचे आरोपही आता होत आहेत. पण प्रत्यक्षात नेमकी ही राजकीय भूमिका आहे, नागरिक म्हणून मत आहे की कुठल्या सिनेमाचं प्रमोशन आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकारच्या सोशल मीडियाच्या वापरावर आक्षेप नोंदवला आहे. ज्या पद्धतीने एकाच वेळी कलाकार पुन्हा निवडणूक असा हॅशटॅग वापरत आहत त्यामागे भाजपचा आयटी सेल सक्रिय झाला आहे, असं वाटतं.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #पुन्हानिवडणूक? #MarathiMovie #Congress #SachinSawant

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Recommended