Raosaheb Danve | मासा छोटा असो किंवा बडा, अडकला तो अडकला | रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य | Pune

  • 3 years ago
राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत.ही सर्व प्रक्रिया आघाडी सरकारच्या काळातच झाली असून आता मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.पुण्यात नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात ज्यांनी कारखाने डबघाईला आणले त्यांनीच ते परत विकत घेतले. त्यामुळे आमच्या काळात नाही, तर काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या बँकेवर प्रशासक मंडळ नेमले होते. आता आमच्या सरकारच्या काळात बँक नफ्यात आली आहे.त्यानंतर काही समाजसेवी संघटना कोर्टात गेल्या, आणि कोर्टाने निर्णय दिला की भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे बँक आम्ही बरखास्त केली नाही किंवा गुन्हे आम्ही दाखल केले म्हणणे चुकीचे आहे. आम्ही फक्त उच्च निर्णयाची अंमलबजावणी केली.


यावेळी बोलताना ते म्हणाले की, 'आज राष्ट्रवादी काँग्रेस  निवडणूक समोर ठेवून ही कारवाई केली असे म्हणत असली तरी त्यांच्याच काळात सुरू झालेली चौकशी टप्प्याटप्प्याने पुढे गेली व आता गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी काही केलंच नसेल तर घाबरायचं कारण नाही असा टोला लागवून मोकळ्या मनाने चौकशीला सामोरे जावे असा सल्लाही दिला.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Recommended