दीपाली सय्यद यांना आमदारकीची भुरळ | Dipali Sayyed | Pune

  • 3 years ago
कुठल्याही मतदारसंघात निवडणूक लढण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे दीपाली सय्यद यांनाही आमदारकीची भुरळ पडलेली आहे पण

छत्रपती शिवरायांच्या सैन्यदलात सय्यद बंडा होता, असे सांगत आम आदमी पक्षाच्या नगर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दीपाली सय्यद यांनी आपले इतिहासाचे ज्ञान कच्चे असल्याची प्रचिती शनिवारी दिली. प्रत्यक्षात सय्यद बंडा हा मुघल सरदार अफजलखानाचा साथीदार होता याचा विसर त्यांना पडला.

‘आप’च्या उमेदवार दीपाली सय्यद यांनी शनिवारी पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. अभिनेत्री गावात आल्याने त्यांना पाहायला गर्दी झाली होती. हा दौरा झाल्यानंतर सय्यद यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘आपले आडनाव सय्यद असल्याने आपण कोणाची तरी मते खाण्यासाठी उभे राहिलो असलयाची अफवा पसरवली जात आहे. मात्र, माझे आडनाव सय्यद असले, तरी मी पूर्वाश्रमीची भोसले आहे. निवडणूक काळात उगाचच जातीभेदाचे राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांनी शिवरायांच्या सोबत सय्यद बंडा होता हे विसरू नये’, असे असे दीपाली सय्यद म्हणाल्या. या वेळी विशेष म्हणजे सय्यद यांच्या या विधानावर त्यांच्या कार्यकर्त्यांनीही टाळया वाजवून दाद दिली. या वेळी ‘आप’चे कार्यकर्ते किसन आव्हाड, सुरेखा भगत, रुक्मिणी शेलार, शीतल चन्ने, वैखरी शिंदे, नईमखान, किशोर आव्हाड, सुधाकर आव्हाड आदी उपस्थित होते.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #pune
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended