लोकल मधून घेतली उडी जाणून घ्या पूर्ण स्टोरी | Young Girl Jumped off from Local Train
  • 3 years ago
लोकल मधून घेतली उडी जाणून घ्या पूर्ण स्टोरी

महिला डब्यात एकटय़ा असलेल्या १४ वर्षीय मुलीवर एका व्यक्तीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने बचावासाठी त्या अल्पवयीन मुलीने धावत्या लोकलमधून उडी टाकल्याची घटना रविवारी सकाळी घडली. या दुर्घटनेत पीडित मुलगी गंभीररीत्या जखमी झाली असून, तिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सीएसएमटी परिसरात राहणारी १४ वर्षीय मुलगी आठवीत शिकते. रविवारी सकाळी परळ येथे क्लासला जाण्यासाठी ती सीएसएमटीहून सकाळी ९.३१ला सुटणा-या कल्याण स्लो लोकलमध्ये बसली होती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यात तिच्याशिवाय कुणीच महिला प्रवासी नव्हती. लोकल सुटणार तोच डब्यात एक ३० ते ३५ वर्षीय पुरुष शिरला. घाबरलेल्या मुलीने त्याला डब्यातून उतरण्यास सांगितले. त्यावेळी तरुणाने तिला धाक दाखवत शांत बसण्यास सांगितले. मुलीने रेल्वेतील आप्तकालीन साखळी खेचण्याचा प्रयत्न केला असता तो तरुण तिच्यावर धावून गेला.

त्यावेळी रेल्वे रुळावर काम करत असलेल्या गँगमनकडे मुलीचे लक्ष गेले. क्षणाचाही विचार न करता मुलीने धावत्या लोकलमधून बाहेर उडी टाकली. या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीला गँगमननी तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळतात रेल्वे पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत, अनोळखी व्यक्तीविरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल केला. रेल्वे पोलिसांनी सीएसएमटी स्थानकावरील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.
Recommended