"टीपू बलात्कारी हत्यारा होता. मला बोलावू नका", केंद्रिय मंत्री अनंत कुमार यांचा टीपू जयंती ला विरोध

  • 3 years ago
ब्रिटिश शासना विरूद्ध चार युद्ध लढणा-या टीपू सुल्ताान ला केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी बलात्कारी आणि अमानवीय हत्यारा सांगून त्यांच्या जयंती निमीत्त होणा-या कोणत्याहि सरकारी कार्यक्रमात सहभागी न होण्याची घोषणा करत तसे पत्र सरकारी अधिका-यांना दिले आहे. कर्नाटक सरकार ने १० नोव्हेंबर रोजी टीपू सूल्ताान जयंत्ती निमीत्त अनेक कार्यक्रम ठेवले आहेत. अनंत कुमार यांनी ट्वीट केले कि कर्नाटक सरकार ने अशा कट्टरपंथी अमानुष हत्यारा आणि वस्तुमान बलात्कारी च्या गुणगाना साठी मला बोलावू नये. आरएसएस आणि भाजपा ने ह्यास अल्पसंख्यंक तुष्टीकरण म्हणून आधीच विरोध केला आहे. कर्नाटक चे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या म्हणाले टीपू सुल्तान १८ व्या शतकात मैसूर चे राजा होते. ते स्वातंत्र्य सेनानी होते. ईंग्रजां विरूद्ध ४ लढाया लढले, त्यात अग्रेसर होते. त्यांच्या जयंती नीमित्त आमंत्रण केंद्रिय आणि राज्या च्या सर्व नेत्यांना पाठविले जाते. येणे न येणे त्यांचा निर्णय. हा राजनीतीक मुद्दा बनविला जात आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended