पंचमीला अंबाबाईची गजारूढ स्वरूपात पूजा

  • 3 years ago
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पाचव्या माळेला (सोमवारी) करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली.  श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमी. या दिवशी अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोलीदेवीच्या भेटीसाठी जाते. तेथे कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून कोहल्याचा भेद केला जातो. कामाक्ष राक्षसाचा वध करून करवीरच्या पूर्वेला रुसून बसलेल्या त्र्यंबोलीदेवीचा रुसवा काढायला देवी समस्त देव, ऋषी अशा लवाजम्यानिशी त्र्यंबोलीला जाते. या भेटीला अंबाबाई अंबारीत बसून जाते, असा या पूजेमागचा अन्वयार्थ आहे. ही पूजा श्रीपूजक माधव मुनीश्वर व मकरंद मुनीश्वर यांनी बांधली.

Recommended