श्री अंबाबाईची पराशरांना महाविष्णुस्वरूपातील पूजा..!
  • 3 years ago
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची पराशरांना महाविष्णुस्वरूपात दर्शन रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.

धार्मिक ग्रंथामध्ये केलेल्या या रुपातील वर्णनानुसार पराशरांना महाविष्णूस्वरुपात देवीने दर्शन देवून त्यांच्या मनातील संशय भेदभाव दूर केला. त्यानुसार मुनी देवीला विष्णूस्वरुपिनी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात व तिची अष्टकाने स्तुती करतात. या रुपामध्ये देवी जगाच्या पालनकर्त्याच्या रुपात भाविकांना दर्शन देते. देवी गरुडावर बसलेली असून तिच्या हातामध्ये शंख-चक्र अशी आयुधे असल्याचे श्रीपूजक माधव मुनीश्‍वर, मकरंद मुनीश्‍वर यांनी सांगितले.
Recommended