जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे अकोला जिल्हावासीयांना आवाहन | Akola | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांमध्ये शहरी व ग्रामीण भागात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून नियमाचे पालन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी दिले आहेत. या आदेशानुसार अमरावती विभागातील सर्व प्रकारची दुकाने दररोज सकाळी 9 ते 5 या दरम्यान सुरू राहणार आहे. तसेच सर्व प्रकारचे शासकीय व खाजगी कार्यालय 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहणार आहे. सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू ठेवता फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच लग्न समारंभ करता 25 व्यक्ती यांना परवानगी देण्यात आली असून नागरिकांनी जवळ असलेल्या बाजारपेठ दुकान याचा वापर करावा.सर्व प्रकारचे शिक्षण कार्यालय, शाळा महाविद्यालय विद्यापीठ येथील शैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना माहिती उत्तरपत्रिका तपासणी निकाल घोषित करणे याकरिता परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व प्रकारचे शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आली आहेत.मालवाहतूक, वाहतुकीसाठी कुठलेही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी गाड्यांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशांना परवानगी राहणार आहे तर तीन चाकी गाडीत दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्क व दोन प्रवाशांना परवानगी आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended