पुणेकरांनो, सातारा रस्त्यावर आजपासून ‘बीआरटी’ | BRT | PMPML | Pune | Maharashtra | Sakal Media
  • 3 years ago
पुणे - सातारा रस्त्यावरील बस रॅपिड टान्झिट (बीआरटी) आता अखेर आज (शुक्रवार)पासून सुरू होणार असल्याची घोषणा पीएमपीने केली. या मार्गातून बस आणि रुग्णवाहिकेखेरीज अन्य वाहनांना प्रवेश नसेल. सुमारे साडेपाच किलोमीटरच्या बीआरटी मार्गातून प्रतिदिन सुमारे तीन हजार बस फेऱ्या होणार आहेत. सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाचे नूतनीकरण अनेक महिन्यांपासून रखडले होते. उभारलेल्या स्थानकांचीही दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर बीआरटी सुरू करण्यासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार पीएमपीच्या बस शुक्रवारी सकाळपासून कात्रज चौक ते जेधे चौका दरम्यान बीआरटी मार्गातून धावणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended