' अश्व ' संकल्पनेवर कियान आर्ट गॅलरीत चित्र प्रदर्शन | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
औंध,ता.३०.कियान आर्ट गॅलरीच्या 'अश्व' या ब्रॅंड अंतर्गत प्रसिद्ध चित्रकार एम.नारायण यांच्या अश्वांच्या विविध चित्रकृतींचे प्रदर्शन बाणेर रस्त्यावरील वर्षा पार्क येथील कियानच्या कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. कियानच्या संस्थापिका आरती नाईक यांच्या पुढाकाराने या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.या प्रदर्शनात अॕक्रिलीक, चारकोल व जलरंगातील चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.या कला दालनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जवळपास पाचशे चित्रांच्या संग्रह करण्यात आला आहे.या चित्रांचे प्रदर्शन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाणार आहे.यात देशांतर्गत विविध शहरे तसेच अमेरिकेसह विविध युरोपीयन देशात हे प्रदर्शन भरविले जाणार आहे. 'पेट्रोन्स ऑफ आर्ट' या उपक्रमांतर्गत ज्यांना कलेत रुची आहे व‌ चित्रांबद्दल माहिती हवी असल्यास कियान आर्ट गॅलरीच्या वतीने देण्यात येणार असून चित्रकला व त्यासंबंधीचे अर्थशास्त्र याविषयी मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सह-संस्थापक सिध्दार्थ नाईक यांनी सांगितले.कला प्रकारांना व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्यामागील उद्देश असल्याचेही नाईक यांनी सांगितले.२९ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या चित्रप्रदर्शनाला कलाप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळत असून ३१ जानेवारी पर्यंत दुपारी १ ते रात्री ९ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended