अमरावतीत १०६ वर्षाच्या आजीनेही बजावला मतदानाचा हक्क | Amaravati |Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
तिवसा : अमरावती जिल्ह्यातील ५३७ ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी साडे सात वाजतापासून प्रारंभ झाला आहे.ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेत तिवसा तालुक्यातील मोझरी गावातील १०६ वर्षाच्या गया चवने या आजीबाईने देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला आहे.वार्धक्याने गयाबाई चवणे थकल्या असल्या तरी त्यांच्या मध्ये असलेला मतदानाचा उत्साह मात्र तरुणांप्रमाणे कायम आहे.प्रत्येक निवडणूकित त्या नेहमी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहिच्या या प्रक्रियेत त्या सहभाग नोंदवतात..तर अमरावती जिल्हात सकाळी मतदान केंद्रावर शुकशुकाट पहायला मिळाला होता...तर सकाळी 9 वाजता नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी पहायला मिळाली. (व्हिडीओ - प्रशिक मकेश्वर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended