धक्कादायक ! कात्रज प्राणीसंग्राहलायतील ४ हरणांचा मृत्यू; जबाबदार कोण? | Pune | Maharashtra | Sakal |
  • 3 years ago
कात्रज प्राणीसंग्रहालयात ४ हरणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ४ भटक्या कुत्र्यांनी रात्रीच्या वेळी प्राणीसंग्रहालयात प्रवेश करून हरणांचा कळप असलेल्या खंदकात २ नर आणि २ मादी अशा एकूण ४ हरणांची शिकार केली आहे. कुत्र्यांच्या या हल्ल्यात आणखी १ हरिण गंभीर जखमी झाले आहे. कुत्र्यांनी हल्ला केल्याची माहिती प्राणीसंग्राहलयातील कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षारक्षकांना मिळेपर्यंत त्या हरणांचा फडशा पाडला होता. सदरच्या कुत्र्यांना डॉग स्कॉड मार्फत भूल देऊन पकडण्यात आले आहे.
संग्राहलयात एकूण ३४ हरणे आहेत. कात्रज गावठाण बाजूकडील उचकटलेल्या पत्र्यांच्या खालून भटक्या कुत्र्यांनी प्राणीसंग्रहालयात प्रवेश केला. पेशवे तलावाकडून येणाऱ्या ओढ्याचे काम करताना सुरक्षितता बाळगली नसल्याने, त्या ठिकाणी पडलेल्या भगदाडा मधून कुत्र्यांनी प्रवेश केला असल्याचे उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत असून तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या पत्र्याच्या मोकळ्या जागेतून भटक्या कुत्र्यांनी प्रवेश करत जवळच असलेल्या हरणांचे खंदक असलेल्या जागेवर जात हरणांवर हल्ला चढवला. त्यातच ४ हरणांचा मृत्यू झाला तर १ हरिण गंभीर जखमी झाले आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended