"वजीर" सुळका अवघ्या पंधरा मिनिटात सर..! | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
राजेंद्रकृष्ण कापसे
खडकवासला : ठाणे जिल्ह्यातील माहूली किल्ल्यालगत असलेल्या दोनशे फूट उंच 'वजीर' सुळका सिंहगड-डोणजे येथील 23 वर्षाच्या कृष्णा मरगळे या युवा गिर्यारोहकाने अवघ्या पंधरा मिनिटात सर केला.

घनदाट जंगल व खोल दऱ्यामुळे हा प्रदेश अत्यंत निसर्गरम्य आहे. अनेक कठीण आव्हानांना तोंड देत एस एल एडव्हेंचरच्या गिर्यारोहकांनी ही मोहीम यशस्वी पार पाडली. मोहिमेचे नेतृत्व लहू उघडे यांनी केले. तुषार दिघे, शंकर मरगळे यांचाही मोहिमेत सहभाग होता.
दिनांक १२ डिसेंबर रोजी सिंहगड, डोणजे येथील एस. एल. ऍडव्हेंचरचे लहू उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहीमेचे आयोजन केले होते. मोहीमेमध्ये तुषार दिघे, शंकर मरगळे, लहू उघडे यांनी देखील यशस्वीरित्या सहभाग नोंदवला.

एस. एल.एडव्हेंचरचे गिर्यारोहक अशा नवनवीन मोहिमेमध्ये नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी खडपारशी (वानरलिंगी), ड्युक्स नोज, तैलबैला,
कळकराई, लिंगाणा, तानाजी कडा यासारख्या अनेक मोहिमा यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. अशा मोहिमांसाठी शिवाजी राजे क्लाइंबिंग वॉल आणि शिवदुर्ग लोणावळा यांचे सहकार्य मिळाले.

इन्फोबॉक्स
त्याचाच विक्रम त्याने मोडला
सिंहगड येथील २३ वर्षांचा गिर्यारोहक कृष्णा मरगळे यांनी मागील वर्षी २० मिनिटामध्ये वजीर सुळका सर करून विक्रम केला होता. आता तोच सुळका अवघ्या १५:५० मिनिटांमध्ये सर करून वजीरवीर कृष्णाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

इन्फोबॉक्स
सुळक्याला वजीर का म्हणतात
वजीर हा ट्रेकिंगसाठी अत्यंत खडतर असलेल्या
वजीर सुळक्याची उंची २०० फूट असून, माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून दोन हजार ८००फूट आहे.
बुद्धिबळातील वाजीरासारखा दिसणारा हा सुळका ठाणे जिल्यातील माहुली किल्यालगत आहे. चढाईसाठी अवघड असल्यामुळे गिर्यारोहकांसाठी हा सुळका नेहमीच खुणावत आकर्षित करतो.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended