उंडवडी नजीक भोसलेवाडीत साकारतोय पक्षांसाठी ज्युसबार | Pune | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
उंडवडी नजीक भोसलेवाडीत साकारतोय पक्ष्यांसाठी ज्युसबार

राहू, : उंडवडी नजीक भोसलेवाडी (ता. दौंड) येथे 'एक मित्र एक वृक्ष' या संस्थेच्या वतीने पाचशे झाडे लावली असून त्यात झाडांचे ५६ हून अधिक प्रकारच्या झाडांचे वृक्षरोपण नुकतेच करण्यात आले आहे. हा स्तुत्य उपक्रम नव्याने हाती घेतला असून महाराष्ट्रात कदाचित पहिलाच उपक्रम राबवत आहे. अशी माहिती एक मित्र एक वृक्ष संस्थेचे प्रमुख डॉ. प्रशांत मुथा यांनी दिली.
भोसलेवाडी येथील ओढयाशेजारील जागा जेसीबी यंत्राच्या साह्याने साफसपाई करून घेतली. संस्थेचे स्वयंसेवक तसेच गावातील ग्रामस्थांनी आपापसातील किरोकळ मतभेद विसरून अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यास मदत केली. इतर गावातील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करू दिल्यास त्या परिसरातपण आमच्या एक मित्र एक वृक्ष संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाईल. झाडांच्या निघा राखण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आमच्या संस्थेला सहकार्य करावे. असे आवाहन मुथा यांनी केले.

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended