बुलेटवरील हिरो-हिरोईनचा रोमान्स पाहून म्हणे राज ठाकरेही लाजले ! | Raj Thackrey | MANASE | Sakal |
  • 3 years ago
बुलेटवरील हिरो-हिरोईनचा रोमान्स पाहून म्हणे राज ठाकरेही लाजले !

पुणे : महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कात्रज भागातील मांगडेवाडीत '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या शुटिंगचा शुभारंभ झाला. चित्रपटाच्या शुटींगच्या पहिलाच सीन सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांचा बुलेटवर रोमॅंटिक सीन शुट केला आहे. चित्रपटात हा सीन कसा दाखवणार? हे चित्रपटाच्या शुटींगनंतरच कळेल पण सुरुवातीच्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप दिला. त्यानंतर चित्रपटातील ''अभिनेत्याच्या बुलेटवर मागे बसलेली अभिनेत्री थेट बुलेटच्या टाकीवर येऊन त्याच्या गळ्यात पडते.'' अशा रोमॅंटिक रोमॅण्टिग सीनने चित्रीकरणाला सुरुवात झाली. बुलेटवरील हा सीन पाहिल्यानंतर चित्रपटाची मुहूर्त क्लॅप देणारे राज ठाकरे देखील थोडेसे लाजल्याची चर्चा सुरु आहे.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, the Internet, and Mobile. With a heritage of over 82 years, Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended