खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन | Osmanabad | Sakal Media |
  • 3 years ago
उमरगा, (जि.उस्मानाबाद) : काँग्रेस समितीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त व "जीवनदान अभियन" अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने शुक्रवारी (ता.११) उमरग्यातील काँग्रेस भवन येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी शिबीराच्या आयोजनाबद्दलची पार्श्वभूमी सांगितली. दरम्यान शिबीरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदानाचा संकल्प करून प्रत्यक्षात रक्तदानाला सुरूवात केली. (व्हीडीओ : अविनाश काळे, उमरगा)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended