गंगाखेड घाट मूलभूत सुविधांपासून वंचित. | Gangakhed Ghat | Nashik | Sakal | Sakal Media |
  • 3 years ago
गंगाखेड (जि. परभणी) : दक्षिणेची काशी म्हणून गोदावरी नदी ओळखली जाते. त्रंबकेश्वर नाशिक येथून उगम पावणाऱ्या नदीचे पात्र हे गंगाखेड शहरातून जाते, याची दखल घेत अहिल्याबाई होळकर यांनी गोदावरी नदी काठावर घाटाची निर्मिती केली. याठिकाणी महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्यातून नातेवाईक या घाटावर दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी येतात. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यात गंगाखेड येथील घाट प्रसिद्ध असून दशक्रिया विधीसाठी नागरिकांची नेहमीच गर्दी असते. परंतु या ठिकाणी कुठल्याही मूलभूत सुविधा नसल्यामुळे नातेवाईकांना यातना सोसाव्या लागत असल्याची प्रचिती येत आहे.
(व्हिडिओ : अभय कुळकजाईकर)
#Gangakhed #Nashik #Dhashakriyavidhi
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended