कोरोनासुराचा वध करण्यासाठी दार उघड बये, दार उघड ; तळजाई माता मंदिरात साकारली भव्य रांगोळी

  • 3 years ago
कोरोनासुराचा वध करण्यासाठी दार उघड बये, दार उघड ; तळजाई माता मंदिरात साकारली भव्य रांगोळी

पुणे : "कोरोनासुराचा वध करण्यासाठी दार उघड बये, दार उघड'' असा संदेश देणारी सुरेख आणि रेखीव रांगोळी तळजाई माता मंदिराबाहेर रांगोळी साकारण्यात अली आहे. पुणे शहरात मोठया प्रमाणात कोरोना रुग्ण होते या कोरोनाचा वध लवकर झाला पाहिजे यासाठी ही रांगोळी काढण्यात आली आहे.

सरसेनापती हंबीरराव या आगामी मराठी चित्रपटाचे भव्य रांगोळी पोस्टर तळजाई माता मंदिरात साकारण्यात आलं आहे. ही रांगोळी साकरण्यासाठी शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 7 वाजे पर्यंत असे तब्बल 12 तास लागले. ही रांगोळी काढण्यासाठी 10 लोकांनी मदत केली. सुमारे 90 किलो रांगोळी यासाठी वापरण्यात आली. रांगोळी पूर्ण झाल्यावर आतिषबाजी करण्यात आली होती. ही रांगोळी मयूर दुधाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काढली होती. हे रांगोळी प्रदर्शन सर्वांसाठी 16 तारखे पर्यँत खुले राहील अशी माहिती संदीप मोहिते यांनी दिली

(व्हिडिओ : सागर व्हिडिओ)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Recommended