उमरेड शहरात मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई | Mask | Sakal Media |
  • 3 years ago
उमरेड (जि. नागपूर) : आठ महिन्यांपासून अवघ्या विश्वाला तडाखा बसविणाऱ्या कोरोना महामारीची दुसरी लाट दिवाळीच्या अवकाशानंतर सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर उमरेड शहरात मंगळवारी दुपारी बारा वाजतापासून स्थानिक अतिवर्दळीचे मध्यवर्ती ठिकाण असलेले संताजी जगनाडे चौक येथे पोलिसांचा ताफा तैनात होता. सोबतच दिमतीला महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन एकत्रित मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करताना दिसून आले. २६ तारखेपासून नागपूर जिल्ह्यात (ग्रामीण) येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मास्क न वापरणाऱ्यांवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे पत्रक जारी करण्यात आले आहे. (व्हिडिओ - सतीश तुळसकर)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended