सातारा जिल्ह्यातील निमसोड गावात मगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीती | Satara | Crocodile | Sakal
  • 3 years ago
निमसोड (जि. सातारा) : येरळा धरणाच्या जुन्या नदीपात्रात मगर असल्याचे बुधवारी काही नागरिकांना दिसून आले. त्यानंतर रात्री वनविभाग तसेच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. येरळा नदी पात्रात मगर असल्याचे समजताच परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे नदी पात्रात पाण्यात वाढ झाली होती. त्यामुळे येरळा धरणातील पाणी पातळीवाढून धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. या वाढत्या व वाहत्या पाण्यातून ही मगर येरळा धरणात आली असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिक व प्रशासनाने व्यक्त केला. बुधवारी दुपारी या परिसरातील नागरिकांना याठिकाणी मगरीचे दर्शन झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती.
वनविभागाचे कर्मचारी सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि वनविभाग यांना मगर पकडण्यात यश आले.Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended