अतिवृष्टी व रोगामुळे शेतकरी हवालदिल - आमदार भीमराव तापकीर | Sakal Media |
  • 3 years ago
अतिवृष्टी व रोगामुळे शेतकरी हवालदिल - आमदार भीमराव तापकीर
खडकवासला - "अतिवृष्टी झाली त्यातून वाचलेल्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे यंदा शंभर टक्के नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना अशा प्रकारे पूर्ण नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करणार आहे." असे आमदार भीमराव तापकीर यांनी सकाळ'शी बोलताना दिली खडकवासला मतदार संघातील कुडजे ते जांभळी, आंबी ते किरकटवाडी व खेड शिवापूर यादरम्यान चा परिसरात आमदार तापकीर यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर महसूल विभागाचे मंडल अधिकारी विकास पाटील उपस्थित होते. यावेळी, सचिन मोरे,अभिजीत धावडे, सचिन दांगट- पाटील नवनाथ तागुंदे, तानाजी थोपटे, सचिन दांगट, बाजीराव पारगे, विठ्ठल ठाकर, नंदू जावळकर, निलेश जावळकर सुनील पायगुडे सहभागी झाले होते. गावातील आजी माजी सरपंच ग्रामस्थ उपस्थित होते.
#SakalMedia #Rain #BhimraoTapkir #Khadakwaslaconstituency #Farmer

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended